Ad will apear here
Next
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी
शिवचरित्र हा तमाम मराठी वाचकांसाठी एक वाचनीय ठेवा असतो. लेखक श्रीकांत गोवंडे यांनी प्रामुख्याने बालवाचकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी हे पुस्तक लिहिले आहे. रायगडावरील विविध ठिकाणांची छायाचित्रे, प्रतापगड, पावनखिंड आदी ठिकाणांचे फोटो या पुस्तकात आहेत.

शहाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या विवाहापासून ते शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंतचा इतिहास ३८ गोष्टींच्या रूपाने सांगण्यात आला आहे. शिवरायांच्या आयुष्यातील नाट्यमय प्रसंगांचे रसाळ वर्णन पुस्तकात आहे. लहान मुले हा लक्ष्य वाचक असल्यामुळे प्रासंगिक चित्रे पुस्तकात आहेत. खातरूपाने सांगितलेला इतिहास अधिक चांगला लक्षात राहतो. त्यामुळे हा इतिहासही बालवाचकांसाठी उपयुक्त ठरेल.

प्रकाशक : अनमोल प्रकाशन
पाने : १५०
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZPYBJ
Similar Posts
अनमोल सणांच्या गोष्टी आपले सण व उत्सव हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. आपली संस्कृती टिकून राहण्यास आणि पुढे नेण्यास ते उपयुक्त ठरतात; तसेच सद्गुणांची परंपरा कायम राखतात. त्यामुळे नव्या पिढ्यांना सणांचे महत्त्व समजायला हवे. त्या दृष्टीने श्रीकांत गोवंडे यांनी या पुस्तकात आपल्या सण-उत्सवांची माहिती दिली आहे.
ध्यान- एक दर्शन व मार्गदर्शन ‘ध्यान ही नैसर्गिक सहजावस्था आहे, ही आपल्या सर्वात जवळची अवस्था आहे,’ असे डॉ. संप्रसाद विनोद यांनी म्हटले आहे. या पुस्तकात त्यांनी ध्यानाविषयीचे सर्व समज-गैरसमज दूर केले आहेत. शिवाय ध्यान कसे करावे, ध्यानाचे प्रकार कोणते आदी विषयांवरही मार्गदर्शन केले आहे.
मराठे व इंग्रज पेशव्यांचे राज्य बुडाले, त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ‘मराठेशाहीचे शतसावंत्सरिक श्राद्ध’ असे पुस्तक लिहिले, तेच हे पुस्तक. पूर्वरंग आणि उत्तरांग असे पुस्तकांचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात इंग्रजांपूर्वीचा महाराष्ट्र, इंग्रज हिंदुस्थानात का व कसे आले, या प्रश्नांचा
उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य यांच्या कथा आपल्याला माहित असतात; पण त्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते उद्योजक होते, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले असून, त्यांच्या या गुणावर प्रकाश टाकला आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय करणे हाच खरा श्रीमंतीचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language